IMG-LOGO
महाराष्ट्र लोकसभा

संजय राऊत यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची औरंगजेबाशी तुलना

Thursday, Mar 21
IMG

संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे.

मुंबई, दि. २१ :  लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारास सुरूवात झाली आहे. बुलढाण्यातील एका सभेत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेबाशी केली. इतकंच नाहीतर २०१४ च्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची तुलना अफजलखानाशी केली होती.संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त केला. नरेंद्र मोदींना औरंगजेब म्हणणं हा देशद्रोह आहे असं ते म्हणाले आहेत. "हे दुर्देव आहे. देशभक्त आणि राष्ट्रभक्त असणाऱ्या मोदींनी देशाला नवा आयाम, उंची दिली. बाळासाहेबांचं राम मंदिर बांधण्याचं, जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवण्याचं स्वप्न मोदींनी पूर्ण केलं. अशा पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणं देशाचा अपमान, देशद्रोह आहे. त्यांची निंदा करावी तेवढी कमी आहे. कारण त्यांनी औरंगजेबी वृत्ती त्यांनी दाखवली आहे. औरंगजेबाने भावांना, वडिलांनाही सोडलं नव्हतं. पण यांना महाराष्ट्रातील जनता निवडणुकीतून उत्तर देत सूड घेईल", असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.  संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेब यांच्याशी केल्याने भाजप नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान केला असून निवडणूक आयोगाकडे धाव घेणार आणि कारवाईची मागणी केली आहे. 

Share: