संसदेचे एखादे सदस्य बोलत असताना दुसऱ्या कोणत्याही सदस्याने बोलणाऱ्या सदस्यासमोर बसू नये.
दिल्ली, दि. २६ : सभागृहाचं कामकाज चालू असताना एक मंत्री खिशात हात टाकून सभागृहात आले आणि ते त्यांच्या टेबलाजवळ जात होते. ते पाहून लोकसभा अध्यक्ष संतापले. ओम बिर्ला त्यांची नाराजी व्यक्त करत म्हणाले, “मंत्री जी तुमचे हात खिशातून बाहेर काढा… मी संसदेच्या सर्व सदस्यांना आग्रह करतो की तुम्ही सर्वजण खिशात हात टाकून सभागृहात येऊ नका.ओम बिर्ला यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर मंत्री काहीतरी उत्तर देण्याचा प्रयत्न करत होते. ते पाहून ओम बिर्लांचा पारा आणखी चढला. लोकसभा अध्यक्ष मंत्री महोदयांना म्हणाले, तुम्ही मध्ये का बोलताय. तुम्हाला काय विचारायचं आहे ते सांगा, तुम्ही इतरांना खिशात हात टाकून सभागृहात फिरण्याची परवानगी द्याल का? मला हे वागणं योग्य वाटत नाही. सर्व सदस्यांना माझं आणखी एक सांगणं आहे की संसदेचे एखादे सदस्य बोलत असताना दुसऱ्या कोणत्याही सदस्याने बोलणाऱ्या सदस्यासमोर बसू नये. इतर सदस्यांनी त्याच्या मागे जाऊन बसावं. असेही त्यांनी नमूद केले.