रामनवमीनिमित्त त्रिदिनात्मक, श्री राम याग घेण्यात आला.
नाशिक, ता. १७ : येथील महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानचा १९ वा वर्धापनदिन व रामनवमीनिमित्त त्रिदिनात्मक, श्री राम याग घेण्यात आला. या प्रसंगी प्रतिष्ठानचे सचिव वेदमूर्ती रवींद्र पैठणे, वेदमूर्ती वैभव मांडे, वेदमूर्ती शुभम जोशी, वे. धनंजय जोशी, वे. अक्षय जोशी, यजमान श्री व सौ सौरभ हरदास, वे. गोविंद पैठणे, विश्वस्त दत्तात्रय पैठणे, शृंगेरी शंकराचार्य मठाचे रामगोपालजी अय्यर, बहुभाषिक ब्राह्मण महासंघ नाशिकचे शहराध्यक्ष अॅड. भानुदास शौचे उपस्थित होते. पाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी वेदपठण केले.