IMG-LOGO
नाशिक शहर

नाशिकच्या 'सोच' ला राष्ट्रीय लघुपट पुरस्कार

Monday, Oct 21
IMG

सोच या लघुपटास संपूर्ण भारतातून राष्ट्रीय पातळीवरून प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे.

नाशिक, दि. २१ :  नाशिकच्या मे.डी.एस.प्राॅडक्शनच्या सोच या हिंदी लघुपटास राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.   केंद्र सरकारच्या My gov. हया  संकेतस्थळावर २ ऑक्टोबर, 2023 ते ३० ऑक्टोबर, 2023 दरम्यान खादी आणि व्हिलेज इंडस्ट्रीला उभारी देण्यासाठी तसेच कुटिर उद्‌योगांना प्राधान्य देऊन भारत देश आत्मनिर्भर व्हावा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्पना आहे. त्यास अनुसरून  भित्तिचित्र, पथनाटय आणि  लघुचित्रपट निर्मिती स्पर्धा  घेण्यात आल्या.   लघुचित्रफीत ३ मिनिटांच्या कालावधीत  बसवून खादी व इतर कुटिरोद्‌योग ह्यांना प्रोत्साहन देणे.  त्या वस्तूंचा वापर दैनंदिन जीवनात करून कारागिरांना उत्पन्ना‌चे साधन मिळून ते स्वतः आत्मनिर्भर करणे  व  पर्यायाने भारताच्या आत्मनिर्भरते कडे वाटचाल करणे. हाच  उद्देश पकडून नाशिक येथील सौ. मधुरा शहाणे लिखीत, श्री. महेंद्र शहाणे निर्मित आणि सौ . संगीता पवार -फुके, दिग्दर्शित  "सोच" ३ मिनिटाचा  लघुचित्रपट तयार केला . त्यात सौ. सई मोने, दिपक टावारे , जगदीश गडकरी, चंद्रवदन दिक्षित, श्री. व सौ मोने , गोपाल जगताप, महेंद्र पाटील, प्रमोद सावळे,  श्रीमती रेखा नरवाडे, आणि यश्वी, अबीर , स्तुती या बाल  कलाकारांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. तसेच चित्रीकरण व संकलन विशाल सक्सेना आणि संगीत कु. मंदार व कु. मनिष शहाणे ह्या दोघांनी मिळून दिलं आहे. संपूर्ण देशातून ३३८ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. " सोच " हया  लघुपटास संपूर्ण भारतातून राष्ट्रीय पातळीवरून प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे.  ही लघुचित्रपट  त्यांच्या पहिलाच प्रयत्न होता.संपूर्ण चमूचे देशातील विविध भागातून कौतुक होत आहे.

Share: