योग केल्याने शरिर व मन सुदृढ राहते असल्याचे वाकलकर यांनी सांगितले. तसेच या वेळी ब्रह्माकुमार दिलीप बोरसे यांनी योगाचे महत्त्व सांगितले.
नाशिकरोड, दि. २१ : योग भारताने जगाला दिलेली देणगी आहे . दररोज योग केल्याने शरिर व मन सुदृढ राहते असे प्रतिपादन पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल व आरंभ महाविद्यालयाचे प्राचार्य उमाकांत वाकलकर यांनी केले.नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिकरोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल व आरंभ महाविद्यालयात जागतिक योग दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळा समितीचे अध्यक्ष रावसाहेब गायधनी होते.या वेळी व्यासपीठावर उपप्राचार्या प्रा. संगीता पवार, ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे दिलीप बोरसे, सुधा कोटणकर, ज्योत्स्ना काकड, क्रीडा शिक्षक प्रा. संदिप गांगुर्डे उपस्थित होते.या वेळी ब्रह्माकुमार दिलीप बोरसे यांनी योगाचे महत्त्व सांगितले. सुधा लोटणकर, ज्योत्स्ना काकड यांनी म्युझिकल योगा घेतले . संदिप गांगुर्डे यांनी मारूती स्तोत्र सादर केले. रावसाहेब गायधनी म्हणाले, योग हे भारताने जगाला दिलेली देणगी आहे. दररोज योग केल्याने शरिर तंदुरूस्त राहते असे त्यांनी सांगितले. या वेळी विद्यार्थ्यांनी योगाचे प्रात्यक्षिक सादर केले. सूत्रसंचालन प्रा. निलेश खैरनार यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रा. संदिप निकम. प्रा. राजेश खताळे, प्रा. प्रविण खैरे, प्रा. सुदेष्णा नवाळे, प्रा. उषा क्षिरसागर, प्रा. जयश्री सुरवाडे, प्रा. अर्चना भडांगे, विजय नागपूरे, सुधाकर मुठाळ, राजू येसुरकर यांनी परिश्रम घेतले.