अदानी पोर्ट्स १.४२ टक्के आणि टाटा मोटर्स १.३५ टक्क्यांनी वधारले.
मुंबई, दि. १ : शेअर बाजारात शुक्रवारी सायंकाळी पारंपरिक दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग सत्र पार पडल्याने सेन्सेक्स ३३५.०६ अंकांनी वधारून ७९,७२४.१२ वर तर निफ्टी ९४.२० अंकांनी वधारून २४,२९९.५५ वर बंद झाला. दरम्यान, संध्याकाळी ६ वाजता मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स ४४७.९० अंकांनी वधारून ७९,८३६.९६ वर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजारावर निफ्टी २४,३५५.४५ किंवा १५०.१० अंकांनी वधारला. बीएसईशेअर्समध्ये महिंद्रा अँड महिंद्रा २.६६ टक्के, अदानी पोर्ट्स १.४२ टक्के आणि टाटा मोटर्स १.३५ टक्क्यांनी वधारले. एनटीपीसी, अॅक्सिस बँक, टायटन, इंडसइंड बँक, टाटा स्टील, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि भारती एअरटेल चे समभाग वधारले. एक तासाच्या विशेष ट्रेडिंग सत्रापूर्वी सायंकाळी ५.४५ ते ६ या वेळेत प्री-मार्केट ट्रेडिंग सेशन होते. तसेच सणासुदीप्रमाणेच या दिवशीही नियमित व्यवहार बंद होते. नुकताच एएनआय वृत्तसंस्थेने मुहूर्त ट्रेडिंगचा व्हिडिओ शेअर केला आहे.