IMG-LOGO
महाराष्ट्र लोकसभा

राष्ट्रवादीला सोबत घेण्याची गरज नव्हती; भरत गोगावले यांचे धक्कादायक विधान

Tuesday, Mar 26
IMG

आता सोबत घेतलंय तर त्यांनाही आपल्या बरोबरीने वागवणे गरजेचं आहे अशी सारवासारव गोगावले यांनी नंतर केली आहे.

रायगड, दि. २६ : विजय शिवतारे यांनी बारामतीतून निवडणूक लढण्यावर अडून असल्यामुळे शिवसेनेकडून कारणे दाखवा नोटीस बजाबण्यात येणार आहे. अजित पवार गट महायुतीत असताना विजय शिवतारे सातत्याने त्यांच्यावर आरोप करत आहेत, शिवाय पक्षाकडून कोणतीही अधिकृत घोषणा नसताना बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर वक्तव्य केलं आहे. त्यामुळे पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे येत्या २४ तासात उत्तर द्यावं, अशी नोटीस शिवतारे यांना बजावण्यात आली आहे. त्यानंतर आता शिंदे गटाचे  आमदार भरत गोगावलेंनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याची गरज नव्हती असं धक्कादायक विधान केले आहे. राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने अडचण होत असल्याची जणू गोगावले यांनी कबूलीच दिली आहे. दोघांचे सरकार व्यवस्थित चालले होते. काही राजकीय गणिते करून त्यांना सोबत घेतलं आहे.आता सोबत घेतलंय तर त्यांनाही आपल्या बरोबरीने वागवणे गरजेचं आहे. हेवेदावे असतील ते बाजूला ठेवले पाहिजेत. आम्ही सत्तेतून बाहेर पडलो, नवीन सत्ता स्थापन केली तेव्हा तटकरे, अजित पवार आमच्या सोबत नव्हते. पण आता सोबत आलेत तर हातात हात घालून चालतोय. त्यामुळे विजय शिवतारे यांनीही आता हातात हात घालून अजित पवार यांच्यासोबत चालावं, असे गोगावले यांनी म्हटले आहे. आता सोबत घेतलंय तर त्यांनाही आपल्या बरोबरीने वागवणे गरजेचं आहे अशी सारवासारव गोगावले यांनी नंतर केली आहे.

Share: