IMG-LOGO
COVID-19

राज्यात ११ लाख १७ हजार ७२० रुग्ण कोरोना मुक्त

Saturday, Oct 03
IMG

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६९ लाख ६० हजार २०३ नमुन्यांपैकी १४ लाख १६ हजार ५१३ नमुने पॉझिटिव्ह ( २०.३५ टक्के) आले आहेत.

मुंबई, दि. ०३ ऑक्टोबर  : राज्यात आतापर्यंत ११ लाख १७ हजार ७२० रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.९१ टक्के आहे. सध्या २ लाख ६० हजार ८७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी  १३ हजार २९४ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले तर १५ हजार ५९१ नवीन रुग्णांची नोंद झाली.आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६९ लाख ६० हजार २०३ नमुन्यांपैकी १४ लाख १६ हजार ५१३ नमुने पॉझिटिव्ह ( २०.३५ टक्के) आले आहेत. राज्यात  २१ लाख  ९४ हजार ३४७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २९ हजार ५१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात  ४२४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के एवढा आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  सांगितले.

Share: