IMG-LOGO
राष्ट्रीय

अरविंद केजरीवाल यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Monday, Apr 01
IMG

दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयाने केजरीवाल यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दिल्ली, दि. १ : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडी, १५ एप्रिलपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, केजरीवाल यांनी तपासात सहकार्य केले नाही असे ईडीने सांगितले आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयाने केजरीवाल यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.मद्य विक्री धोरण प्रकरणी पीएमएलए कोर्टाने अरविंद केजरीवाल यांची २८ मार्चला चार दिवसांची ईडी कोठडी वाढवली होती. केजरीवाल यांना २१ मार्चला अटक केली होती. त्यानंतर केजरीवाल यांना ईडीने २२ मार्चला कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यानंतर कोर्टाने केजरीवाल यांना सहा दिवसांसाठी ईडी कोठडीत पाठवले होते.  केजरीवाल यांना तुरुंगात  ‘हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाईड्स’ हे पुस्तक त्यांना त्यांच्याजवळ हवं आहे. भगवतगीता, रामायण हे दोन ग्रंथ ठेवण्याचीही परवानगी मागितली. तसेच यासह त्यांनी तुरुंगात गळ्यातलं धार्मिक लॉकेट परिधान करण्याची परवानगी मागितली. केजरीवालांनी त्यांची औषध आणि विशेष डाएटची मागणी केली आहे.

Share: