IMG-LOGO
राष्ट्रीय

काश्मीरमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा

Friday, Apr 09
IMG

काश्मीरचे पोलिस महासंचालक विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार पाचही दहशतवादी मारले गेले आहेत.

श्रीनगर, दि. ९ एप्रिल :  जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत पाच दहशतवादांच्या खात्मा करण्यात आला. या चकमकीत दहशतवादी संघटना अंसार गजवातुल हिंदचा प्रमुख इम्तियाज अहमद शाह याच्यासह पाच दहशतवादी ठार झाले आहेत. काश्मीरचे पोलिस महासंचालक विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार पाचही दहशतवादी मारले गेले आहेत. हे स्थानिक दहशतवादी होते. मृतांमधील दोन दहशतवादी हे हिजबुल मुजाहिद्दीन, एक लष्कर-ए-तोयबा, तर दोन दहशतवादी हे अन्य दहशतवादी संघटनेचे होते. एका पोलिस अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, बाबा मोहल्ला परिसरात दहशतवाद असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर परिसराला घेराव घालण्यात आला आणि नाकाबंदी करण्यात आली. या वेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले. दरम्यान, गुरुवारी रात्री झालेल्या चकमकीनंतर शोपियांमधील मशिदीत लपलेल्या दोन दहशतवाद्यांना पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लपलेल्या दहशतवाद्याचा भाऊ आणि स्थानिक इमामांना दहशतवाद्यांचे मतपरिवर्तन करून, त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगण्यासाठी मशिदीत पाठवण्यात आले. मशिदीचे नुकसान टालण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पुलवामाच्या त्राल मध्ये शुक्रवारी सकाळी एका चकमकीत दोन अज्ञात दहशतवाद्यांनाही सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार केले.

Share: