जवळपास 33 रुग्ण उपचार घेत होते. मात्र गुरुवार मध्यरात्रीच्या सुमारास रुग्णालयातील आयसीयू विभागात आग लागली. त्यावेळी आयसीयूत 11 रुग्णांवर उपचार सुरु होते.
राजकोट, दि. २७ नोव्हेंबर : गुजरातमध्ये एका कोव्हिड रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील उदय शिवानंद असे या रुग्णालयाचे नाव आहे. ही आग सर्वप्रथम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागली. हे कोव्हिड रुग्णालय असल्याने आयसीयूत एकूण 11 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यात सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर या आगीत काही रुग्ण हे जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील उदय शिवानंद रुग्णालय हे कोव्हिड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यात जवळपास 33 रुग्ण उपचार घेत होते. मात्र गुरुवार मध्यरात्रीच्या सुमारास रुग्णालयातील आयसीयू विभागात आग लागली. त्यावेळी आयसीयूत 11 रुग्णांवर उपचार सुरु होते.