नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुनही यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
नवी दिल्ली, दि. ११ सप्टेंबर : प्रसिद्ध अभिनेते आणि भाजप नेते परेश रावल यांची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा च्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे माजी खासदार परेश रावल आता एनएसडीची धुरा सांभळतील. राजस्थानचे प्रसिद्ध कवी अर्जुन देव चरण यांची जागा ते घेणार आहेत.नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुनही यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. एनएसडी परिवारात या लिजंड कलाकाराचे स्वागत आहे. एनएसडीला एका विशिष्ठ उंचीवर नेण्याचं काम ते आपल्या अनुभवातून करतील, असेही या ट्विटर हँडलवर म्हटले आहे.परेश रावल भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर अहमदाबाद पूर्वमधून खासदार होते. परेश रावल यांनी आपल्या सिनेकारकिर्दिची सुरुवात 'होली' सिनेमातून केली होती. त्यानंतर बॉलिवूडमध्ये त्यांनी अनेक सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारल्या. त्यांनी नुसत्या भूमिका साकारल्या नाहीत तर त्या भूमिकांना न्याय दिला. सिनेमांमध्ये खलनायक असो किंवा कॉमेडियन भूमिका प्रत्येकवेळी त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांच्या याच कामामुळे त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.