IMG-LOGO
COVID-19

अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण

Friday, Dec 18
IMG

लॉकडाउनच्या काळात नाटक, सिनेमा सगळंच बंद होतं. ते लवकर सुरु व्हावं यासाठी प्रशांत दामले आणि इतर नाट्यकर्मींनी पुढाकार घेतला होता.

मुंबई, दि. १८ डिसेंबर : मराठी सिनेनाट्य क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण झाली असल्यामुळे मुंबईत होणाऱ्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा रिओपनिंगचा प्रयोग रद्द करण्यात आला आहे. यासोबत डॉक्टरांनी किमान सात दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याच्या सुचना ६१ वर्षीय प्रशांत दामले यांना दिल्या आहेत.लॉकडाउनच्या काळात नाटक, सिनेमा सगळंच बंद होतं. ते लवकर सुरु व्हावं यासाठी प्रशांत दामले आणि इतर नाट्यकर्मींनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर सरकारची परवानागी मिळाल्यानंतर १२ डिसेंबरला पुण्यात एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा प्रयोग झाला होता. तसंच चिंचवडलाही एक प्रयोग झाला होता. यानंतर प्रशांत दामले जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्यांना कणकण जाणवू लागली. त्यामुळे त्यांनी बुधवारी करोना चाचणी केली जी पॉझिटिव्ह आली आहे अशी माहिती प्रशांत दामले यांनी दिली आहे.

Share: