IMG-LOGO
राष्ट्रीय

आदित्य ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

Monday, Aug 24
IMG

परीक्षांचा मुद्दा सध्या राज्यात आणि देशात गाजत आहे. सर्वोच्च न्यायालयात विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेसंदर्भात सुनावणी सुरू आहे.

मुंबई, दि. २४ ऑगस्ट : देशात कोरोना व्हायरसचा धोका कायम असताना प्रवेश परीक्षेंच्या तारखा जाहीर करण्यात आल्याने जोरदार विरोध होत आहे. भाजपशिवाय इतर राजकीय पक्षांचा या परीक्षांना विरोध आहे. तसंच विद्यार्थी आणि पालकांमध्येही कोरोना काळात परीक्षा घेण्याबाबत नकारात्मक सूर आहे. अशातच आता युवासेनेचे प्रमुख आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित या परीक्षा रद्द करण्यासाठी आपण लक्ष घालावं, अशी मागणी केली आहे.परीक्षांचा मुद्दा सध्या राज्यात आणि देशात गाजत आहे. सर्वोच्च न्यायालयात विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेसंदर्भात सुनावणी सुरू आहे. युवा सेनेचे नेते आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी न्यायालयाचा निकालाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. शैक्षणिक वर्ष जून-जुलै २०२० ऐवजी जानेवारी २०२१ पासून सुरू करावे, ज्यामुळे कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही. विविध शाखांच्या परीक्षा आणि प्रवेश पूर्व परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका असल्यामुळे या प्रकरणात पंतप्रधानांनी स्वत: हस्तक्षेप करावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

Share: