नाशिकमधील रुग्णालयामध्ये झालेल्या ऑक्सिजन गळतीची बातमी ऐकून दु:ख झालं आहे.
नवी दिल्ली, दि. २१ एप्रिल : नाशिकमधील ऑक्सिजन गळतीमुळे जी घटना घडलीय त्यामुळे मन सुन्न झालं आहे अशी भावना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली.“नाशिकमधील रुग्णालयामध्ये झालेल्या ऑक्सिजन गळतीची बातमी ऐकून दु:ख झालं आहे. या अपघातामध्ये ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे त्यांच्या कधीही न भरुन येणाऱ्या नुकसानीसाठी मी सद्भावना व्यक्त करतो. इतर सर्व रुग्णांच्या आरोग्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो,” असं शाह यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.