IMG-LOGO
राष्ट्रीय

अमूलने वादग्रस्त चॅनेल्सवरील जाहिराती हटविणार असल्याचे दिले संकेत

Tuesday, Oct 13
IMG

अमूलनेही या वादग्रस्त चॅनेल्सवरील आपल्या जाहिराती बंद करण्याचे संकेत दिले आहे. काही दिवसांपूर्वी तीन चॅनेल्सचे नाव टीआरपी स्कॅममध्ये माध्यमांत झळकले होते.

मुंबई, दि. १३ ऑक्टोबर :  मुंबई पोलिसांनी टीआरपी स्कॅमचा पर्दाफाश केल्यानंतर टेलिव्हिजन माध्यमांत खळबळ माजली आहे. त्यानंतर, जाहिरातदार आणि मीडिया एजन्सींकडून या संबंधित टेलिव्हिजनवर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे. तर, बजाज  पारले कंपनीने एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला होता. पारले जी बिस्कीटाची वादग्रस्त चॅनलवरून जाहिरात केली जाणार नसल्याचे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने घोषित केले. आता अमूलनेही या वादग्रस्त चॅनेल्सवरील आपल्या जाहिराती बंद करण्याचे संकेत दिले आहे.  काही दिवसांपूर्वी तीन चॅनेल्सचे नाव टीआरपी स्कॅममध्ये माध्यमांत झळकले होते.उद्योगपती आणि बजाज कंपनीचे संचालक राजीव बजाज यांनी तीन न्यूज चॅनेल्संना बॅन केलं आहे. समाजात विष कालवणाऱ्या, तेढ निर्माण करणाऱ्या कोणासोबतही आम्ही व्यवहार करु इच्छित नाही. बजाज एक विश्वासपूर्ण ब्रँड असून आम्ही सामाजिक बांधिलकी जपतो, असेही राजीव बजाज यांनी म्हटले आहे. आक्रमकता आणि सामाजिक स्वास्थ बिघडविणाऱ्या चॅनेल्सवर पैसा खर्च करण्याची कंपनीची थोडीही इच्छा नाही. असे पारले जी कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले होते. 

Share: