IMG-LOGO
COVID-19

लस टोचून घेणाऱ्या हरियाणाच्या आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

Saturday, Dec 05
IMG

चाचणीमध्ये निम्म्या स्वयंसेवकांना लस आणि निम्म्या स्वयंसेवकांना प्लेसबो देण्यात आला. मात्र स्वयंसेवकांना याबाबत माहिती दिली जात नाही. तसेच लसीचे दोन डोस घेणे आवश्यक असते. त्यानंतर शरीरात अँटिबॉडीज् तयार होत असतात.

नवी दिल्ली, दि. ५ डिसेंबर :  हैदराबादस्थित भारत बायोटेकने विकसित केलेली ‘कोवॅक्सिन’ ही लस चाचणीदरम्यान घेतल्यानंतर हरयाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे या लसीबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.अनिल विज यांनी 20 नोव्हेंबर रोजी लशीच्या ट्रायलदरम्यान लस घेतली होती. मात्र त्यानंतरही ते कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामागे दोन कारणं असू शकतात. पहिले म्हणजे कोणत्याही लशीच्या ट्रायवदरम्यान काही लोकांना प्लासीबो दिला जातो आणि काहींना लस दिली जाते. हे सांगितले जात नाही, तर केवळ डेटामध्ये लिहिले जाते. चाचणीमध्ये निम्म्या स्वयंसेवकांना लस आणि निम्म्या स्वयंसेवकांना प्लेसबो देण्यात आला. मात्र स्वयंसेवकांना याबाबत माहिती दिली जात नाही. तसेच लसीचे दोन डोस घेणे आवश्यक असते. त्यानंतर शरीरात अँटिबॉडीज् तयार होत असतात.

Share: