IMG-LOGO
COVID-19

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना कोरोनाची लागण

Sunday, Dec 13
IMG

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी होम आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे मी पालन करतो आहे.

नवी दिल्ली दि, १३ डिसेंबर : डिसेंबर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यांनी स्वतः त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. कोरोनाची लक्षणं दिसत असल्याने मी कोरोनाची चाचणी केली. त्यानंतर माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी होम आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे मी पालन करतो आहे. माझं हे आवाहन आहे की गेल्या काही दिवसांमध्ये ज्या व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या आहेत त्यांनी त्यांची कोरोना चाचणी करुन घ्यावी. गेल्या काही महिन्यांमध्ये राजकीय व्यक्तींपासून मनोरंजन आणि इतर क्षेत्रातील दिग्गजांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त वारंवार समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या काही दिवसात देशातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी सर्वांनाच कोरोनाच्या लशीची प्रतीक्षा आहे. भाजपचे नेते आणि महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नड्डा यांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रातील तुमच्या आगमनाची आम्ही वाट पाहत आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यांचा मुंबईत १८ डिसेंबरपासून तीन दिवसीय दौरा होता. पण त्यांनी हा दौराही पुढे ढकलला आहे. 

Share: