IMG-LOGO
राष्ट्रीय

तत्काळ राजीनामा न देण्यावरून भाजपची केजरीवालांवर टीका

Sunday, Sep 15
IMG

केजरीवाल यांना राजीनामा देण्यासाठी ४८ तासांची गरज का? असा सवाल केला आहे.

दिल्ली, दि. १५ :  रविवारी केजरीवाल यांच्या राजीनाम्याची घोषणा झाल्यापासून भाजपकडून सातत्याने हल्ले केले जात आहेत. यावेळी भाजपने अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षावर (आप) अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजप नेते सुधांशु त्रिवेदी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केजरीवाल यांना राजीनामा देण्यासाठी ४८ तासांची गरज का? असा सवाल केला आहे.दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल १५६ दिवसानंतर तिहार जेलबाहेर आले असून तुरुंगातून बाहेर येताच त्यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या दोन दिवसांनंतर आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची  घोषणा केजरीवाल यांनीकेली आहे.त्यांच्या या घोषणेनंतर, त्यांनी आताच राजीनामा का दिला नाही, असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे. केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी ४८ तासांचा अवधी का हवा आहे, त्यांनी जेलमधूनच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा का दिला नाही, असा सवाल भाजपने केला आहे.

Share: