IMG-LOGO
राष्ट्रीय

बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूचं वृत्त धक्कादायक, क्लेशदायक : राहुल गांधी

Sunday, Oct 13
IMG

विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी पोस्ट टाकून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मुंबई, दि. १३  :  अजित पवार गटाचे नेते व माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे.  मुंबईतील वांद्र पूर्व परिसरातील खेरनगरमधील राम मंदिर परिसरात घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.  गोळीबारानंतर बाबा सिद्दीकी यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी पोस्ट टाकून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राहुल गांधी म्हणाले बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूचं वृत्त धक्कादायक आणि क्लेशदायक आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबसह आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या घटनेने महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे हेच दिसून येतं आहे. सरकारने याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि बाबा सिद्दीकींना न्याय मिळाला पाहिजे असंही राहुल गांधी यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Share: