IMG-LOGO
राष्ट्रीय

झारखंडचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

Saturday, Jul 27
IMG

सी. एच. विजयशंकर मेघालयचे राज्यपाल असतील, तर के. कैलाशनाथ पुद्दुच्चेरीचे उपराज्यपाल असतील.

नवी दिल्ली, ‍‍दि. २७  : झारखंडचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे आता महाराष्ट्राचे राज्यपाल असणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याबाबतची घोषणा केली आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली आहे. राधाकृष्णन हे आता रमेश बैस यांची जागा घेतील. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नेमणूक झाली होती. आता सी. पी. राधाकृष्णन यांची या पदावर नेमणूक झाली आहे.सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची आसाम आणि मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर जिष्णू देव वर्मा हे तेलंगणाचे राज्यपाल असतील. प्रकाश माथूर यांच्याकडे सिक्कीमची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गुलाब चंद कटारिया यांची पंजाबच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर रमेन डेका यांच्याकडे छत्तीसगड राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सी. एच. विजयशंकर मेघालयचे राज्यपाल असतील, तर के. कैलाशनाथ पुद्दुच्चेरीचे उपराज्यपाल असतील.

Share: