चंडिगड या एका केंद्रशासित प्रदेशातही मतदान होणार आहे.
नवी दिल्ली, दि. ३१ : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील प्रचार गुरुवारी सायंकाळी संपुष्टात आला. या टप्प्यात सात राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील ५७ मतदारसंघांमध्ये उद्या, शनिवारी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या या अंतिम टप्प्यात ९०४ उमेदवार रिंगणात आहेत. पंजाबमधील सर्व १३ आणि हिमाचल प्रदेशातील सर्व चार जागांसाठी मतदान होणार आहे. चंडिगड या एका केंद्रशासित प्रदेशातही मतदान होणार आहे. त्याशिवाय ओडिशा विधानसभेच्या ४२ जागांसाठीही मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातही याच टप्प्यात मतदान होणार आहे. पंजाबमधील भंटिडा मतदारसंघातील शिरोमणी अकाली दलाच्या हरसिमरत कौर, हिमाचल प्रदेशातील मंडीतील भाजप उमेदवार अभिनेत्री कंगना राणावत, काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह हे महत्त्वाचे उमेदवार आहेत.