खेडकरची भारतीय प्रशासकीय सेवेतून (आयएएस) हकालपट्टी केली आहे.
दिल्ली, दि. ७ : बनावट प्रमानपत्रं सादर करून आयएसएस झालेल्या पूजा खेडकर यांना आता यूपीएससी नंतर केंद्र सरकारने मोठा दणका दिला आहे. सुरुवातीला केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) आयएएस प्रोबेशनर पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांची तात्पुरती उमेदवारी रद्द केली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारने पूजा खेडकरची भारतीय प्रशासकीय सेवेतून (आयएएस) हकालपट्टी केली आहे.