IMG-LOGO
COVID-19

कोरोना रोखण्यासाठी केंद्राचा पंचसूत्री कार्यक्रम जाहीर

Monday, Apr 05
IMG

बैठकीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोना लसीकरण अभियानाचा आढावा घेण्यात आला.

नवी दिल्ली, दि. ५ एप्रिल  : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. विविध राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत पंचसूत्री कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला. या बैठकीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोना लसीकरण अभियानाचा आढावा घेण्यात आला. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत अधिकार्‍यांना काही निर्देश दिले आहेत. कोरोनाबाबत जनजागृती आणि अभियानातील त्यांचा सहभाग हा महत्वाचा असल्याचे मोदी यांनी सांगितले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोदी यांनी अधिकार्‍यांना पंचसूत्री कार्यक्रम समजावून सांगितला. टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट, कोरोना नियमांचे पालन आणि लसीकरण जर पूर्ण गंभीररित्या आणि कटीबद्धपणे राबवले गेले, तर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. त्यासाठी अधिकार्‍यांनी जनजागृतीवर भर देण्याचे निर्देश मोदी यांनी दिले आहेत.कोरोनापासून बचावासाठी देशभरात सहा ते 14 एप्रिल दरम्यान विशेष मोहीम राबवली जाणार आहे. यात मुखपट्टीचा शंभर टक्के वापर, वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता किती गरजेची आहे, याबाबत नागरिकांना माहिती दिली जाणार आहे.

Share: