IMG-LOGO
राष्ट्रीय

ऑक्सिजन पुरवठा थांबवल्याने कोरोनाबाधितांचे जीव टांगणीला

Thursday, May 06
IMG

बेल्लारीहून होेणारा ऑक्सिजन पुरवठा कर्नाटकने थांबवला आहे.

मुंबई, दि. ६ मे  : कोरोनाबाधित रुग्णांची राज्यात वाढ होत असताना वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा सुरू झाला. त्यामुळे राज्याने देशभरातील इतर राज्यांतून ऑक्सिजनची मागणी केली आणि त्यानुसार महाराष्ट्राला विविध राज्यांकडून ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास सुरुवात झाली; मात्र आता केंद्र सरकारने कर्नाटकमधून राज्याला होणारा ऑक्सिजन पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्याच्या अडचणीत वाढ होणार आहे.या संदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना म्हटले, की कर्नाटकहून येणारा ऑक्सिजन पुरवठा थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे आणि त्यामुळे निश्‍चितच अडचणी येणार आहेत. राज्याच्या वाट्याचा ऑक्सिजन थांबवणे योग्य नाही. या संदर्भात आम्ही वरिष्ठ स्तरावर बोलत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत बोलणार आहेत. 1750 टन ऑक्सिजनची राज्याला दररोज गरज आहे.बेल्लारीहून होेणारा ऑक्सिजन पुरवठा कर्नाटकने थांबवला आहे. यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रावर परिणाम होणार आहे; मात्र ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ऑक्सिजनचा निर्मिती, साठवण आणि वितरण या बाबत महाराष्ट्राला स्वावलंबी बनविण्यासाठी ’महाराष्ट्र मिशन ऑक्सिजन’ ही मोहीम सुरू कण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्रत 1800 टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. यापैकी 1295 टन ऑक्सिजनची निर्मिती महाराष्ट्रात होते, तर सुमारे 500 टन ऑक्सिजन आपणास इतर राज्य व केंद्र शासनाच्या मदतीने उपलब्ध होत आहे. अल्पकाळातील आवश्यकतेचा विचार करता, महाराष्ट्र स्वावलंबी होण्यासाठी राज्यात सुमारे 382 अतिरिक्त ऑक्सिजन प्लांटसची स्थापना करण्यात येत आहे. त्यातून 240 टन ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. विशेष म्हणजे ही सर्व कामे युद्ध पातळीवर सुरू असून सर्व प्लांटस जून अखेरील सक्रिय होणार आहेत.

Share: