IMG-LOGO
राष्ट्रीय

चेक क्लिअरींगची प्रतीक्षा संपणार

Saturday, Feb 06
IMG

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ही माहिती दिली. रिझर्व्ह बँकेने भारतात सीटीसी सुविधा 2010 मध्ये सुरू केली.

मुंबई, दि. ६ फेब्रुवारी :  येत्या सप्टेंबरपासून बँकांच्या सर्व शाखांमध्ये सीटीएस सिस्टीम सुरू होणार आहे. सध्या देशातील काही शहरांमध्येच सीटीएस पद्धती चेक वटवण्यासाठी वापरली जाते. देशात सध्या 18 हजार बँका सीटीएस प्रणालीच्या बाहेर आहेत. त्यामुळे आता चेक वटण्यासाठी जास्त काळ वाट पाहण्याची आवश्यकता नाही.रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ही माहिती दिली. रिझर्व्ह बँकेने भारतात सीटीसी सुविधा 2010 मध्ये सुरू केली. सध्या काही शहरांमध्ये सीटीएस सुविधा सुरू आहे. सप्टेंबर 2021 पासून देशातील बँकांच्या सर्व शांखांमध्ये ही सुविधा सुरू होईल. केंद्रीय बँकांनी चेक व्यवहार सुरक्षित होण्यासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम सुरू केली आहे. ही प्रणाली एक जानेवारीपासून सुरू झाली आहे. याअंतर्गत 50 हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा चेक वटवला जाणार आहे. चेकने व्यवहार करताना तो ज्या बँकेचा दिलेला असतो, त्या बँकेत क्लिअरिंगसाठी घेऊन जावे लागत असे; मात्र सीटीएस पद्धत सुरू झाल्यानंतर चेक वटवणे सोपे झाले आहे. सीटीएस प्रणालीमुळे चेक क्लिअरिंग सोपे आणि जलद झाले आहे. सीटीएस पद्धतीत चेक दुसर्‍या बँकेत घेऊन जावे लागत नाही. चेक ऐवजी त्याची इलेक्ट्रोनिक प्रतिमा दुस-या बँकेत पाठवली जाते. त्या बँकेकडून मंजुरी आल्यानंतर ग्राहकाच्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले जातात. यामध्ये चेक फाटणे किंवा खराब होणे, अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होत नाहीत.

Share: