IMG-LOGO
राष्ट्रीय

जादूटोण्याचा संशय, तीन महिलांसह पाच जणांची हत्या

Monday, Sep 16
IMG

पोलिसांनी सांगितलं की, जादू-टोणा केल्याच्या संशयातून या हत्या करण्यात आल्या आहेत.

सुकमा, दि. १६  : छत्तीसगडमध्ये आदिवासीबहुल सुकमा जिल्ह्यातील एका गावात रविवारी एक संतापजनक घटना घडली आहे. रविवारी (दि. १५) येथील दोन दाम्पत्यांसह एका महिलेची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याचं प्रकरण समोर आलं आहे. पोलिसांनी सांगितलं की, जादू-टोणा केल्याच्या संशयातून या हत्या करण्यात आल्या आहेत. मौसम कन्ना (३४) व त्याची पत्नी मौमस बिरी, मौसम बुच्चा (३४) व त्याची पत्नी मौसम आरजू, तसेच आणखी एक महिला काका लच्छी (४३) अशी या घटनेतील पाच मृत व्यक्तींची नावं आहेत.पोलिसांनी याप्रकरणी एकाच गावातील पाच आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी केली जात आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या घटनेची माहिती देताना सांगितलं की ही घटना कोंटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या एका गावात घडली आहे. 

Share: