चीन जगातील सर्वांत ताकदवान सैन्य असलेला देश ठरला आहे. चीनला 82 गुण देण्यात आले आहेत. समुद्रमार्गे कोणतेही युद्ध झाले तर चीन सर्वात ताकदवान ठरेल आणि युद्ध जिंकेल
नवी दिल्ली, दि. २१ मार्च : सीमेवर वारंवार भारताला आव्हान देणारा चीन आता लष्करी सामर्थ्यात सर्वांत पुढे निघून गेला आहे. सतत शेजारच्या देशांच्या सीमेवर डोळा ठेवणार्या आणि विनाकारण कुरापती करणार्या चीनला ’मिलिटरी डायरेक्ट’ने जगातील सर्वांत ताकदवान लष्कर म्हणून घोषीत केले आहे. 74 गुणांसह अमेरिका दुसर्या स्थानावर आहे आणि 69 गुणांसह रशिया तिसर्या क्रमांकावर आहे. सैन्य ताकदीच्या बाबतीत रशियाच्यानंतर भारताचा चौथा क्रमांक लागतो. या अहवालात भारत 69 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, अहवालातील माहितीनुसार सैन्यदलावर कोट्यवधींचा खर्च करणारा अमेरिका चीनपेक्षा मागे आहे. यादीत फ्रान्स देश 58 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे, तर 43 गुणांसह ब्रिटन सहाव्या स्थानावर आहे. संरक्षणासाठीचे बजेट, सक्रिय आणि निष्क्रिय सैन्य कर्मचार्यांची संख्या, हवाई, नौदल आणि लष्कर तसेच अण्वस्त्रांची उपलब्धता व किमान वेतन अशा विविध मुद्द्यांचा अभ्यास करून देशांच्या सैन्य ताकदीची यादी तयार करण्यात आली आहे. चीन जगातील सर्वांत ताकदवान सैन्य असलेला देश ठरला आहे. चीनला 82 गुण देण्यात आले आहेत. समुद्रमार्गे कोणतेही युद्ध झाले तर चीन सर्वात ताकदवान ठरेल आणि युद्ध जिंकेल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे, तर हवाई दलात अमेरिका सर्वांत आघाडीवर आहे. लष्करी युद्धात रशिया सर्वाधिक सक्षम असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. संरक्षण क्षेत्रावर सर्वाधिक खर्च करणार्या देशांमध्ये अमेरिका आघाडीवर आहे. अमेरिकेकडून दरवर्षी किमान 732 अब्ज डॉलर इतका सैन्यावर खर्च केले जातात. चीनकडून 261 अब्ज डॉलर इतका खर्च केला जातो. भारत यात तिसर्या स्थानावर असून भारताकडून संरक्षणावर 71 अब्ज डॉलर इतका खर्च केला जातो.अमेरिकेकडे सर्वांधिक लढाऊ विमानेअमेरिकेकडे सध्या तब्बल 14 हजार 141 लढाऊ विमाने ताफ्यात आहेत. रशियाकडे चार हजार 682 लढाऊ विमाने आहेत. चीनकडे तीन हजार 588 लढाऊ विमाने आहेत. त्यामुळे हवाईदलात अमेरिका सर्वांत आघाडीवर आहे. लष्करी सामर्थ्याबाबत बोलायचे झाले, तर रशियाकडे सर्वाधिक 54 हजार 866 लढाऊ वाहने आहेत. अमेरिकेकडे 50 हजार 326 आणि चीनकडे 41 हजार 641 लष्करी वाहनांचा समावेश आहे. नौदलात चीनचा हात कुणीही पकडू शकत नाही अशी परिस्थिती आहे. चीनकडे तब्बल 406 लढाऊ जहाजे आहेत, तर रशियाकडे 278 आणि अमेरिकेकडे 202 जहाजे तैनात आहेत.