IMG-LOGO
राष्ट्रीय

डॅ्रगनला पुन्हा लढाईची खुमखुमी

Tuesday, May 11
IMG

सीसीटीव्हीच्या दाव्यानुसार, केवळ तीन मिनिटांत ही रॉकेट सिस्टिम युद्धासाठी तयार होते.

नवी दिल्ली, दि. ११  मे :  गलवान खोर्‍यात भारतीय जवानांवरील हल्ला परतवून लावल्याने बराच काळ तणाव निर्माण झाला होता. आता पुन्हा भारत कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत पुरता घुसमटलेला असताना चीनने पूर्व लडाखमधील सीमेवर युद्धाची वेगवान तयारी केली आहे.चीनने घातकी आणि लांब पल्ल्यावर मारा करू शकणारे अत्याधुनिकल पीएचएल-03 मल्टिपल रॉकेट लॉन्चर्स तिबेटच्या भारतीय सीमेजवळ तैनात केले आहेत. चीनच्या सरकारी टीव्ही चॅनेलने सीसीटीव्हीने याबाबतचे वृत्त दिले आहे. ही रॉकेट लाँचर्स भारतीय सीमेवर तैनात असलेल्या शिनजियांग कमांडकडे सोपविण्यात आली आहेत. सीसीटीव्हीच्या दाव्यानुसार, हे रॉकेट ट्रकवरून नेता येऊ शकते. तसेच हे रॉकेट पूर्णपणे संगणक संचलित आहे. एकाचवेळी अनेक ठिकाणांना लक्ष्य करू शकते. ’साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या रिपोर्टनुसार ही रॉकेट लाँचर्स लडाख सीमेवर 5200 मीटर उंचीवर तैनात करण्यात आली आहेत. हा तोच भाग आहे, जिथे गेल्या वर्षी हिंसा झाली होती. हे रॉकेट लाँचर्स वेगाने तैनात केले जाऊ शकतात. या रॉकेट लाँचर्समुळे चिनी सैनिक तिबेटच्या पठारी भागात, वाळवंटी भागात आणि प्रत्येक ऋतूमध्ये युद्ध लढू शकतात. या रॉकेट लाँचरमध्ये 12 ट्यूब आहेत, ज्यात 12 इंच कॅलिबरची बॅरल आहेत. प्रत्येक रॉकेटचे वजन हे 800 किलो आहे. या रॉकेटची मारकक्षमता ही 60 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने 130 किलोमीटरपर्यंत आहे.सीसीटीव्हीच्या दाव्यानुसार, केवळ तीन मिनिटांत ही रॉकेट सिस्टिम युद्धासाठी तयार होते. ही सिस्टीम चीनच्या बाईदू सिस्टीमशी जोडण्यात आली आहे, त्यामुळे ही सिस्टीम योग्य निशाणा साधू शकेल. याशिवाय चीनने लडाखमध्ये भारतीय जवानांना उत्तर देण्यासाठी खूप हलक्या वजनाचे 15 टँक, 155 मिलीमीटरच्या 181 तोफा आणि पर्वतरांगांमध्ये उड्डाण करू शकणारे ड्रोन तैनात केले आहेत. ही तयारी भारत कोरोना संकटात सापडलेला असताना चीन करू लागला आहे.

Share: