कोरोनाची माहिती लपवण्याबाबत चीनवर सातत्याने आरोप करण्यात येत आहे. कोरोना संसर्गाच्या मुद्यावर चीन संशयाच्या भोवर्यात अडकला असताना आणखी एक दावा करण्यात येत आहे.
चीनकडून लपवाछपवी; कोरोनाच्या विषाणूचा उगम शोधण्यात अपयशवुहान, दि. ११ जानेवारी : चीनच्या वुहान येथील वायरॉलॉजी प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या महत्त्वाच्या संशोधनाचा ऑनलाइन डेटा उडवण्यात आल्याचे वृत्त आहे. यामध्ये प्राण्यांपासून मानवांमध्ये होणा-या विषाणू संसर्गाच्या अभ्यासाचा समावेश आहे. संपूर्ण जगभरात कोरोनाचा फैलाव होण्यास आता जवळपास एक वर्ष झाले आहे; मात्र अद्यापही कोरोनाच्या विषाणूचा उगम कसा झाला, कुठून फैलावला याबाबतची ठोस माहिती समोर आलेली नाही. कोरोनाची माहिती लपवण्याबाबत चीनवर सातत्याने आरोप करण्यात येत आहे. कोरोना संसर्गाच्या मुद्यावर चीन संशयाच्या भोवर्यात अडकला असताना आणखी एक दावा करण्यात येत आहे. वुहान येथील प्रयोगशाळेशी निगडीत असलेल्या महत्त्वाचा ऑनलाइन डेटा डिलीट करण्यात आला आहे. ’डेली मेल’ दिलेल्या वृत्तानुसार, वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलजीमध्ये करण्यात येणार्या संशोधनाशी निगडीत असलेली जवळपास 100 पानांची माहिती डिलीट करण्यात आली आहे. नॅशनल नॅचरल सायन्स फाउंडेशन ऑफ चायनाने जवळपास तीनशेहून अधिक संशोधन अभ्यास प्रकाशित केले होते. यामध्ये प्राण्यांपासून मानवांमध्ये फैलावणार्या आजारांबाबत संशोधन करण्यात आले. आता हे संशोधन, अभ्यास आता उपलब्ध नाही. त्यामुळेच चीनवर करोनाचा उगमस्थान लपवण्याचा आरोप पुन्हा एकदा करण्यात येत आहे. झेंगली यांना बॅटवुमन म्हणून ओळखले जाते. वटवाघळांच्या गुहेत जाऊन त्यांनी अनेकदा नमुने जमा केले आहेत. त्यांचे संशोधनही डिलीट करण्यात आले आहे. हे संशोधन वटवाघळांपासून दुसर्या प्राण्यांमध्ये सार्सच्या कोरोना विषाणूच्या धोक्यावर अभ्यास करण्यात आला होता.माहिती दडपण्याचा प्रयत्चीनने करोनाबाबतची माहिती लपवली असल्याचा आरोप सातत्याने करण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या चौकशी पथकालाही चीनमध्ये प्रवेश नाकारण्यात आले होते. त्यामुळे या आरोपाला आणखीच बळ मिळाले होते. चीनने या विषाणूबाबत फारसे गांभीर्य दाखवले नाही आणि त्याशिवाय संपूर्ण जगाला अंधारात ठेवल्यामुळे करोोनाचा फैलाव झाला असल्याचा आरोप चीनवर करण्यात येतो.