कुलूमधील निर्मंड, सैंज आणि मलाना तर मंडीमधील पधर आणि शिमला जिल्ह्यातील रामपूर येथे ढगफुटी झाली.
कुलू, दि. २ : हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी आणि उत्तराखंडमध्ये ढगफुटीसदृश पावसाने कहर केला. यावेळी झालेल्या विविध घटनांमध्ये उत्तराखंडमध्ये १२, तर हिमाचल प्रदेशात ४ नागरिकांचा मृत्यू झाला असून ५० नागरिक बेपत्ता झाले आहेत. हिमाचल प्रदेशात अनेक घरांची पडझड झाली असून शेकडो पूल आणि रस्ते वाहून गेले.