प्रकृती बिघडल्याने त्यांना त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. कोरोनातून बरे झाले होते मात्र त्यांना दुसऱ्या एका विषाणूने घेरले होते.
पुणे, दि. १६ मे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार राजीव सातव यांचं दुर्दैवी निधन झालं आहे. राजीव सातव यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. नुकतेच राजीव सातव यांच्या शरीरामध्ये एक वेगळ्या प्रकारचा व्हायरस सापडला असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.काँग्रेसचे खासदार अॅड. राजीव सातव पुणे येथील जहांगीर हॉस्पिटल येथे कोरोनावर उपचार घेत होते. 29 एप्रिल रोजी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. कोरोनातून बरे झाले होते मात्र त्यांना दुसऱ्या एका विषाणूने घेरले होते.गरज भासल्यास इक्मो मशीन देखील उपलब्ध करण्यात आली होती. मुंबईल येथील डॉ. राहुल पंडित, डॉ. शशांक जोशी यांच्या पथकाने पुणे येथे येऊन त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांच्यावर उपचार सुरू होते.