IMG-LOGO
COVID-19

काँग्रेस खासदार अहमद पटेल यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

Thursday, Oct 01
IMG

राज्यसभा खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत पटेल यांनी ट्वीट करुन माहिती दिली आहे.

नवी दिल्ली, दि. ०१ ऑक्टोबर  : राज्यसभा खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत पटेल यांनी ट्वीट करुन माहिती दिली आहे. पटेल यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसात जे लोक माझ्या संपर्कात आले होते त्यांना मी विनंती करतो की, त्यांनी स्वतःला आयसोलेट करावं. काँग्रेस खासदार अहमद पटेल हे आताच झालेल्या पावसाची अधिवेशनात सहभागी झाले होते.

Share: