IMG-LOGO
राष्ट्रीय

संरक्षण प्रकरणांच्या संसदीय समितीच्या बैठकीतून काँग्रेसचं 'वॉक आउट'

Wednesday, Dec 16
IMG

बैठकीतून बाहेर येताच राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. "संसदीय समितीने सैन्याच्या गणवेशावर चर्चा करुन वेळ वाया घालवला.

नवी दिल्ली, दि. १६ डिसेंबर : संरक्षण विषयक संसदीय समितीच्या बैठकीत सैन्य दलातील जवानांचे ड्रेस बदलण्याच्या चर्चेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी चांगलेच भडकले. जवानांना कशा पद्धतीचा गणवेश असावा हे समितीतील खासदार ठरवू शकत नाहीत. तो आपला अधिकार नाही, सैन्य दलांच्या प्रमुखांनाच गणवेशाबाबतचा निर्णय घेऊ द्यावा, असं सांगत राहुल गांधी यांनी या चर्चेला विरोध केला. त्यामुळे या समितीचे अध्यक्ष जुएल ओरम आणि राहुल गांधी यांच्या शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे संतापलेल्या राहुल यांनी या समितीच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.संरक्षक विषयक संसदीय समितीचे अध्यक्ष जूएल ओरम यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत आज बैठक झाली. यावेळी 'चिफ ऑफ डिफेन्स' (सीडीएस) बिपीन रावत देखील उपस्थित होते. बैठकीतून बाहेर येताच राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. "संसदीय समितीने सैन्याच्या गणवेशावर चर्चा करुन वेळ वाया घालवला. त्याऐवजी सैन्याला कशाप्रकारे अधिक सुसज्ज करता येईल यावर चर्चा होणं अपेक्षित होतं", असं राहुल गांधी म्हणाले.

Share: