घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून पालक आणि विद्यार्थी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सासवड, दि. ७ मे : पुरंदर तालुक्यातील आंबळे येथील निराधार लहान मुलांसाठी चालविण्यात येत असलेल्या सार्थक अनाथ आश्रमात कोरोनाने शिरकाव केला आहे. आश्रमातील तब्बल 19 मुले कोरोनाबाधित झाली आहेत. ही सर्व मुले 8 ते 9 या वयोगटातील आहेत. या सर्वाना सासवड-जेजुरी रस्त्यावरील आनंदी कोव्हीड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून पालक आणि विद्यार्थी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.