महाराष्ट्रात 24 तासात 3824 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 5008 लोक बरे झाले आणि 70 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 18 लाख 68 हजार 172 लोकांना संसर्ग झाला आहे.
नवी दिल्ली, दि. ११ डिसेंबर : देशात गेल्या 24 तासात 29,398 जणांना कोरोनाची लागण झाली असून, 414 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 97 लाख 96 हजार 769 एवढा झाला आहे. सध्या देशातील विविध भागात 3 लाख 78 हजार 785 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात 24 तासात 3824 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 5008 लोक बरे झाले आणि 70 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 18 लाख 68 हजार 172 लोकांना संसर्ग झाला आहे. यापैकी 71 हजार 910 रूग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 17 लाख 47 हजार 199 लोक बरे झाले आहेत. संसर्गाने जीव गमावणार्यांची संख्या आता 47 हजार 972 झाली आहे.