कोरोना व्हॅक्सीनला अखेर मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता कोरोनाची लस अधिकृतरित्या बाजारात आली आहे.
लंडन, दि. २ डिसेंबर : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसवर लस कधी येणार याची प्रतीक्षा लागून आहे. अखेर इंग्लंडमध्ये पुढील दोन आठवड्यात कोरोना लशीचे वाटप होणार आहे. ब्रिटेनने फायझर आणि बायोएनटेक (Pfizer-BioNTech Coronavirus Vaccine) च्या कोरोना व्हॅक्सीनला अखेर मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता कोरोनाची लस अधिकृतरित्या बाजारात आली आहे.Pfizer ची लस शेवटच्या ट्रायलमध्ये 95% यशस्वी ठरली असल्याचा दावा कंपनीने केला आहे. लसीचा पहला डोस पुढल्या काही दिवसांतच दिला जाईल. ब्रिटेनने 4 कोटी डोस खरेदी केले आहेत. कंपनीच्या चेअरमन अल्बर्ट बोर्ला यांनी सांगितेल आहे की, 'आज ब्रिटेनमध्ये ही लस देण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोविडच्या विरोधातील लढाईत ऐतिहासिक क्षण आहे.'