संचारबंदी लागू करण्यात आल्याने संताप आणि भीती पसरली आहे.
इंफाळ, दि. ९ : मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात संशयित अतिरेक्यांनी दोन पोलीस चौक्या, वन विभागाचे एक कार्यालय आणि किमान ७० घरे जाळली आहेत, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.ग्रामस्थांच्या हत्येनंतर मणिपूरच्या जिरीबाम-तामेंगलाँग सीमा भागात संचारबंदी लागू करण्यात आल्याने संताप आणि भीती पसरली आहे. अतिरेक्यांच्या या हल्ल्यानंतर तणाव वाढला असून पोलीस अधीक्षकांवर बदलीची कारवाई करण्यात आली. संशयित अतिरेक्यांनी ५९ वर्षीय व्यक्तीची हत्या केल्यानंतर गुरुवारी सायंकाळपासून जिरीबाममध्ये हिंसाचार सुरू आहे.संशयित अतिरेक्यांनी ५९ वर्षीय व्यक्तीची हत्या केल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी जिरीबाममध्ये हिंसाचार उसळला. सोइबाम सरतकुमार सिंह असे या व्यक्तीचे नाव असून, ते ६ जून रोजी शेतात गेल्यानंतर बेपत्ता झाले होते. नंतर त्यांचा मृतदेह सापडल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. यानंतर स्थानिकांनी पडक्या इमारतींना आग लावल्यानंतर तेथे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले.