योगी आदित्यनाथ यांनीही दखल घेतली असून अधिकाऱ्यांना तातडीने मदतीच्या सुचना दिल्या आहेत.
नागपूर, दि. ७ : उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमधील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये एक तीन मजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला असून २४ जखमी झाल्याची प्राथमिक आहे. आतापर्यंत २८ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश आलं आहे. तसेच अनेक नागरिक या ढिगाऱ्याखाली अकडले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दखल घेतली असून अधिकाऱ्यांना तातडीने मदतीच्या सुचना दिल्या आहेत.