अमेरिकेत निवडणुकीमध्ये अनेक ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं
दिल्ली, दि. १७ : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्कनेही ईव्हीएम हॅक होऊ शकतं असं म्हटल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका नेत्याने व्यक्त केलेल्या चिंतेवर मस्क यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.अमेरिकेत होणाऱ्या 2024 राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या असलेल्या रॉबर्ट एफ. केनडी ज्युनिअर यांनी पोर्टो रीको येथे झालेल्या निवडणुकीमध्ये अनेक ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं, असं 'असोसिएट प्रेस' या वृत्तसंस्थेचा संदर्भ देत आपल्या एक्स (ट्वीटर) पोस्टमध्ये म्हटलं आहे. मात्र नशिबाने या निवडणुकीमध्ये पेपरवर मतं नोंदवण्यात आल्याने गोंधळ लक्षात आला निसटलेली मतं मोजली गेली, असंही केनडी यांनी सांगितलं. मात्र पेपर नसते तर काय झालं असतं? असा प्रश्न केनडी यांनी उपस्थित केला. त्यावर "आपण इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन्स टाळल्या पाहिजेत. त्या माणसांकडून किंवा एआयकडून हॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा हॅकिंगचा धोका फार अधिक आहे," असं मस्क यांनी या पोस्टवर प्रतिक्रिया नोंदवताना म्हटलं आहे.