IMG-LOGO
लोकसभा २०२४

भारतातील ईव्हीएम ‘ब्लॅक बॉक्स’ ; विश्वासार्हतेविषयी शंका : राहुल गांधी

Tuesday, Jun 18
IMG

राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

नवी दिल्ली, दि. १८ :  लोकसभा निवडणुकीच्या निकाल लागून १५ दिवस झाले असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा मतदान यंत्रांच्या विश्वासार्हतेविषयी शंका उपस्थित केली. ‘भारतातील ईव्हीएम ‘ब्लॅक बॉक्स’ असून ज्याची तपासणी करण्यास कोणालाही परवानगी नाही,’ असे सांगत राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देशातील निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्वाचा अभाव असतो, त्यावेळी लोकशाही लबाडी बनते आणि फसवणूक होण्याची शक्यता असते, अशी टीका गांधी यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर केली.

Share: