अस्वास्थामुळे बारावीच्या परीक्षांसंदर्भातील आज घेतला जाणारा निर्णय लांबणीवर जाऊ शकतो असं म्हटलं जात आहे.
नवी दिल्ली, दि. १ जून : बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालय निर्णय घेणार असून आज शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल या संदर्भात घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. घोषणा करण्यापूर्वी शिक्षणमंत्री पंतप्रधान मोदींना या विषयी माहिती देणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. अशातच रमेश पोखरियाल यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे बारावीच्या परीक्षांसंदर्भातील आज घेतला जाणारा निर्णय लांबणीवर जाऊ शकतो असं म्हटलं जात आहे. कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या समस्यांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिक्षणमंत्री निशंक यांनी २१ एप्रिल रोजी ट्वीटद्वारे माहिती दिली होती की त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासह ते म्हणाले होते की, जे लोक माझ्या संपर्कात आले त्यांनी करोना चाचणी करावी. मंत्रालयाचे काम नेहमीप्रमाणे सुरूच राहिल, असेही त्यांनी म्हटले होते.