IMG-LOGO
लोकसभा २०२४

लोकसभा आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी; विकसित भारत’चे संदेश त्वरित थांबवण्याच्या आयोगाच्या सूचना

Friday, Mar 22
IMG

याबाबत निवडणूक आयोगाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्यानंतर आयोगाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयास हे आदेश दिले आहेत.

दिल्ली, दि. २२ :  आचारसंहिता जारी झाली असतानाही मोदी सरकारची कामगिरी अधोरेखित करणारे संदेश अद्यापही नागरिकांच्या व्हॉट्सॲपवर पाठविले जात असल्याच्या अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्याने ‘विकसित भारत संपर्क’ या व्हॉट्सअॅ प हँडलवरून मोदींचे पत्र पाठवणे बंद करा, असा स्पष्ट आदेश आयोगाने केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला गुरुवारी दिले.याबाबत निवडणूक आयोगाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्यानंतर आयोगाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयास हे आदेश दिले आहेत. आचारसंहिता १६ मार्च रोजी लागू झाली त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र आणि त्याबरोबर संदेश पाठविण्यात आले, असे मंत्रालयाने निवडणूक आयोगाला सांगितले. मात्र, काही तांत्रिक मर्यादांमुळे त्या पुन्हा पाठविल्या गेल्या असल्याची शक्यता आहे, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.दरम्यान , मोदींकडून देशवासीयांना पाठवलेल्या या पत्रामध्ये १० वर्षांतील केंद्र सरकारच्या योजनांमुळे १४० कोटी लोकांना लाभ मिळाल्याचा दावा करण्यात आला होता. विकसित भारत बनवण्यासाठी लोकांकडून सूचनाही मागवण्यात आल्या होत्या. या प्रकरणी लेखी अहवाल सादर करण्याचे निर्देशही आयोगाने मंत्रालयाला दिले आहेत.

Share: