पाच राज्यांतील निवडणुकांमधील काँग्रेसच्या पराभवावरही भाष्य केले.
काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक; कोरोनाचे कारण ठरले निमित्तनवी दिल्ली, दि. १० मे : काँग्रेस कार्यकारिणीच्या समितीच्या बैठकीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सकाळी मुहूर्त निघाला आणि दुपारी कोरोनाचे कारण पुढे करून अध्यक्षपदाच्या निवडणुकीला स्थगितीही देण्यात आली. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ही माहिती दिली. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवावरही त्यांनी चिंता व्यक्त करताना या पराभवातून धडा घ्या, असे आवाहन सोनिया यांनी केले आहे.काँग्रेस कार्यकारी समितीची 22 जानेवारीला बैठक झाली होती. त्या वेळी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक जूनमध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. निडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांनी निवडणुकीचा कार्यक्रम तयार केला आहे; मात्र कोरोनाचे संकट वाढल्याने पक्षाध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे, असे सोनिया यांनी सांगितले.या वेळी त्यांनी पाच राज्यांतील निवडणुकांमधील काँग्रेसच्या पराभवावरही भाष्य केले. या पराभवातून काँग्रेसने धडा घेण्याची गरज आहे. असे निकाल का आले, हे जाणून घेतले पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये आपल्याला एकही जागा मिळाली नाही हे आश्चर्यजनक आहे. या धक्कादायक निकालांची दखल घेतलीच पाहिजे. या निकालांची समीक्षा करण्यासाठी छोटी टीम तयार करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल आल्यावर पुढील दिशा ठरवता येईल, असे त्या म्हणाल्या.सोनिया म्हणाल्या, की या निकालाने मी निराश आहे, असे जर मी म्हटले तर एकप्रकारे वस्तुस्थिती झाकून ठेवल्याचाच तो प्रकार होईल. आपला इतका वाईट पराभव का झाला हे समजून घेतले पाहिजे. या प्रश्नांतून काही न पटणारी उत्तरे येतील; परंतु त्यातून आपण धडा घेतला पाहिजे. आपण सत्य परिस्थितीला सामोरे गेलो नाही किंवा तथ्यांना योग्य प्रकारे पाहिले नाही तर आपण कधीच धडा घेणार नाही. आसाममधील पराभवाची माहिती जितेंद्र सिंह, पश्चिम बंगालची माहिती जितिन प्रसाद, पुद्दुचेरी आणि तामिळनाडूची माहिती दिनेश गुंडुराव आणि केरळची माहिती तारिक अन्वर देतील.या वेळी त्यांनी कोरोनावरून केंद्र सरकारवर टीका केली. कोरोनाचे संकट रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे; मात्र देशातील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण झाले पाहिजे. या संकटाच्या काळात काँग्रेस जनतेच्या सोबत आहे. आता तिसर्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे देशाची आरोग्य व्यवस्था अजून मजबूत करण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले, असं ठासून सांगतानाच सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी सोनिया यांनी पुन्हा एकदा केली. आरोग्य संकटाशी सामना करताना हरएक संभाव्य सहकार्य करण्याचे आवाहन सोनिया यांनी केले.पक्ष सुधारणा करण्याची गरजनुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा धुव्वा उडाला. ’काँग्रेस कार्यकारी समिती’च्या बैठकीत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्ष सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली. हे झटके बसण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या प्रत्येक मुद्यावर विचार-विनिमय करण्यासाठी एका छोट्या समूहाची स्थापना करून, त्याचा लवकरात लवकर अहवाल घ्यावा, असे आदेश त्यांनी दिले.कारणीमीमांसेची गरज’काँग्रेस पक्ष केरळ आणि आसाममध्ये सध्याच्या सरकारला हटवण्यात अपयशी का ठरला? तसेच बंगालमध्येही काँग्रेसला खाते उघडता आले नाही? याची कारणमीमांसा करण्याची गरज आहे. या प्रश्नांची उत्तरे काहीतरी नक्कीच शिकवतील, असे सोनिया यांनी या बैठकीत म्हटले.