खासदार राहिल्यास माझ्या पाठीच्या आणि मानेच्या दुखण्यावर नि:शुल्क उपचार करता येतील, असे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मला सांगितले होते.
अहमदाबाद, दि. ३० डिसेंबर : गुजरातमधील भरुचचे भाजप खासदार मनसुख वसावा यांनी आपला राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची भेट घेतल्यानंतर वसावा यांनी राजीनामा न देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 45 मिनिटे बैठक सुरू होती. खासदार राहिल्यास माझ्या पाठीच्या आणि मानेच्या दुखण्यावर नि:शुल्क उपचार करता येतील, असे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मला सांगितले होते, त्यामुळे राजीनामा परत घेतल्याचे त्यांनी सांगितले.