IMG-LOGO
राष्ट्रीय

मोदी सरकारविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार! ८ डिसेंबरला 'भारत बंद'ची हाक

Friday, Dec 04
IMG

शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची केंद्र सरकारसोबत सुरू असलेली चर्चा देखील फोल ठरत असल्याचं दिसून येत आहे. केंद्रासोबत झालेल्या बैठकीनंतर शेतकरी नेते हरविंदरसिंग लखोवाल यांनी ८ डिसेंबर रोजी 'भारत बंद'चे आवाहन केले आहे.

नवी दिल्ली, दि.४ डिसेंबर  : मागील अनेक दिवसांपासून नवीन कृषी कायद्याविरोधात पंजाब-हरियाणातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहे. सरकारसोबतची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आता शेतकऱ्यांनी ८ डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. कृषी कायदा मागे घेत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मोदी सरकारविरोधात एल्गार दिला आहे.मोदी सरकारने लागू केलेले तिन्ही कृषी कायदे शेती आणि शेतकऱ्यांना कॉर्पोरेटच्या दावणीला बांधणारे आहेत, त्यामुळे ते रद्द करावेत, त्यात सुधारणा नको, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. त्या आंदोलनाचा आज नववा दिवस आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी या कायद्यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी दिल्लीच्या दिशेने निघाले होते, मात्र त्यांना दिल्लीच्या सीमेवरच अडवण्यात आले असले तरी ते आंदोलनावर ठाम आहेत.शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची केंद्र सरकारसोबत सुरू असलेली चर्चा देखील फोल ठरत असल्याचं दिसून येत आहे. केंद्रासोबत झालेल्या बैठकीनंतर शेतकरी नेते हरविंदरसिंग लखोवाल यांनी ८ डिसेंबर रोजी 'भारत बंद'चे आवाहन केले आहे. 

Share: