कृषी कायदे रद्द करण्याची मागणी जोवर पूर्ण होत नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार असल्याचे शेतक-यांनी पुन्हा एकदा सांगितले. येत्या सहा जानेवारी रोजी ट्रॅक्टर मार्च आयोजित करण्यात येणार आहे.
शेतक-याची आत्महत्या; मोदी सरकारच जबाबदार असल्याची सुसाईड नोटनवी दिल्ली, दि. २ जानेवारी : नव्या कृषी कायद्यांवरून सुरू असलेले शेतक-यांचे आंदोलन आता आणखी तीव्र करण्याची तयारी आंदोलन शेतकर्यांनी केली आहे. प्रजासत्ताक दिनी अर्थात 26 जानेवारी रोजी दिल्लीच्या सिंघू सीमेवर ’ट्रॅक्टर परेड’ काढणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाने जाहीर केले आहे. आज दुपारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शेतक-यांच्या प्रतिनिधींनी ही माहिती दिली. दरम्यान, तीन कृषी कायद्याच्या विरोधात उत्तर प्रदेशातील शेतक-याने आत्महत्या केली असून त्याने या आत्महत्येस सरकारला जबाबदार धरले आहे.संयुक्त किसान मोर्चाने आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेला बीएस राजेवाल, दर्शन पाल, गुरूनाम सिंह, जगजीत सिंह, शिव कुमार शर्मा कक्का आणि योगेंद्र यादव उपस्थित होते. चार जानेवारी रोजी जर सरकारने आमची मागणी मान्य केली नाही, तर आंदोलन तीव्र केले जाईल, असे या वेळी सांगण्यात आलं. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी जोवर पूर्ण होत नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार असल्याचे शेतक-यांनी पुन्हा एकदा सांगितले. येत्या सहा जानेवारी रोजी ट्रॅक्टर मार्च आयोजित करण्यात येणार आहे, तर 15 जानेवारी रोजी भाजपच्या नेत्यांना घेराव घालणार असल्याची रणनीती शेतक-यांनी आखली आहे. 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राज्यपाल भवनापर्यंत मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर 26 जानेवारी रोजी दिल्लीत सर्व शेतकरी ट्रॅक्टर परेड करतील, असे शेतकरी आंदोलकांनी जाहीर केले. केंद्राकडून घाईघाईन लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाचा आजचा (शनिवारी) 38 वा दिवस होता. याच दरम्यान, दिल्ली सीमेवर आणखी एका शेतक-याने आत्महत्या करत आपले जीवन संपवले. ’सुसाईड नोट’मध्ये त्याने व्यक्त केलेल्या अंतिम इच्छेने अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले. आत्महत्या करणा-या 75 वर्षीय शेतक-याचे नाव काश्मीर सिंह लाडी असे होते. आत्महत्येअगोदर त्याने एक ’सुसाईड नोट’ही लिहून ठेवली होती. काश्मीर सिंह उत्तर प्रदेशच्या रामपूर जिल्ह्यातील बिलासपूरचे रहिवासी होते. एका वृद्ध शेतक-याने अशा पद्धतीने आयुष्य संपवण्याच्या घेतलेल्या निर्णयावर शेतकरी संघटनांनी दु:ख आणि आक्रोश व्यक्त केला. काश्मीर सिंह याचे कुटुंब मुलगा आणि नातूही आंदोलनात आपले योगदान देत आहेत. काश्मीर सिंह यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये केंद्रातील मोदी सरकार आपल्या आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचाही उल्लेख केला आहे.सीमेवर अंत्यसंस्कार करण्याची अंतिम इच्छामाझ्या मृतदेहावर माझा नातू आणि मुलांच्या हाताने अंत्यसंस्कार व्हावेत तसेच हे अंत्यसंस्कार दिल्ली- उत्तर प्रदेशच्या सीमेवरच केले जावेत, अशी अंतिम इच्छा काश्मीर सिंह यांनी आपल्या ’सुसाईड नोट’मध्ये व्यक्त केली.