एलओसीवर जवान तैनात असताना दहशतवादी घुसखोरी करण्यात यशस्वी कसे होतात. असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
श्रीनगर, दि. ११ : वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूकअब्दुल्लायांनी भारतीय सैन्याबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केलं आहे. त्यांनी दहशतवाद्यांपासून सुरक्षेसाठी तैनात सुरक्षा दलांनी आरोप केला आहे की, ते दहशतवाद्यांशी मिळाले आहेत. नॅशनल कॉन्फरसन्सच्या नेत्यांनी आरोप केला की, भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये संगनमत आहे.अब्दुल्ला यांनी सवाल उपस्थित केला की, एलओसीवर जवान तैनात असताना दहशतवादी घुसखोरी करण्यात यशस्वी कसे होतात. जम्मू काश्मीरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना फारुख अब्दुल्ला यांनी नवा वाद निर्माण करताना म्हटले की, आज आपल्या सीमांवर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात आहेत. कदाचित जगातील सर्वात मोठी डिप्लॉयमेंट आहे. मात्र तरीही आपल्या देशात दहशतवादी घुसतात आणि आम्हाला मारून जातात. भारतीय सैन्यावर गंभीर आरोप करत त्यांनी म्हटले की, दहशतवाद्यांसोबत त्यांचे संगनमत आहे. त्यांना आमचा विनाश हवा आहे, म्हणूनच ते हा खेळ खेळत आहेत.