IMG-LOGO
राष्ट्रीय

देशाचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचं निधन

Sunday, Aug 11
IMG

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

दिल्ली, दि. ११ : माजी परराष्ट्रमंत्री के. नटवर सिंह यांचे शनिवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ९३ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नटवर सिंह यांचे दिल्लीजवळील गुरुग्रामयेथील मेदांता रुग्णालयात निधन झाले. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे.  'नटवर सिंह यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. मुत्सद्देगिरी आणि परराष्ट्र धोरणाच्या जगात त्यांनी भरीव योगदान दिले. ते आपल्या बुद्धीमत्तेसाठी तसेच विपुल लेखनासाठी ही ओळखले जात होते. या दु:खाच्या काळात माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि चाहत्यांसोबत आहेत,' अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

Share: