वैनतेय विद्यालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम; वैनतेय विजय शोभायात्रेने वेधले निफाडकरांचे लक्ष
निफाड, दि. १२ : लोकहितासाठी सज्जनांनी संघटीत होऊन सक्रीय राहीले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक व सुरत येथील ऑरो विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. विश्वास देवकर यांनी केले. निफाड येथील वैनतेय विद्यालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त मंगळवार (दि. ११) रोजी वैनतेय विद्यालयात विविध कार्यक्रम मोठ्या उत्साह पार पडले, त्याप्रसंगी डॉ.देवकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सकाळी 8.30 वाजता निफाड शहरातून वैनतेय विजय शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेला वैनतेय विद्यालयापासून प्रारंभ झाला. या शोभयात्रेत १० विजय रथ काढण्यात होते या शोभायात्रेत वैनतेय विद्यालय, वैनतेय विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स , योगेश्वर विद्यालय दावचवाडी , वैनतेय इंग्लिश मीडियम स्कूल ,वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर ,वैनतेय शिशुविहार या सर्व शाखांच्या वतीने हे विजयरथ सजवण्यात आले होते या विजय शोभायात्रेत प्रारंभी लेझीम पथक, वारकरी नृत्य, ध्वज पथक होते त्याचप्रमाणे या शोभा यात्रेत कोळी नृत्य, गुजराथी दांडिया नृत्य सादर करण्यात आले वृक्षदिंडी आणि ग्रंथदिंड द्वारे वृक्षारोपणाचा पर्यावरणाचा, वाचनाचा संदेश देण्यात आला विजय शोभायात्रेत पर्यावरण, आरोग्य, माझी शाळा सुंदर शाळा ,बेटी बचाव बेटी पढाव ,ग्राम स्वच्छता ,माझी वसुंधरा ,वाचन चळवळ ,मातृदेवो भव पितृ देवो भव , स्वच्छता ऊर्जा ,पाणी बचत , समाज प्रबोधन व वृक्ष संवर्धन या सामाजिक विषयावर हे सर्व विजयरथ सजवण्यात आले होते या विजय रथ शोभा यात्रेद्वारे वरील विषयाद्वारे सामाजिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न करण्यात आला या विजयरथ शोभायात्रेने निफाडकरांचे लक्ष वेधून घेतले होते या विजयरथ शोभा यात्रेत विद्यार्थ्यांनी थोर पुरुषांच्या वेशभूषा केलेल्या होत्या ही शोभायात्रा वैनतेय विद्यालय ,छत्रपती शिवाजी महाराज चौक, शनी मंदिर ,मामलेदार चौक ,माणकेश्वर चौक ,पेठ गल्ली मार्गे वैनतेय विद्यालयात आणण्यात आलीही विजय शोभायात्रा वैनतेय विद्यालयात आल्यानंतर विद्यार्थी शिक्षक गुणगौरव सोहळा संपन्न झाला या गुणगौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी न्या रानडे विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे संस्थापक विश्वस्त अँड आप्पासाहेब उगावकर हे होते प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार व सुरत येथील आरो विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभाग प्रमुख डॉ. विश्वास देवकर , डॉ. शोभा नेर्लीकर, निफाडच्या नगराध्यक्षा डॉ. कविता धारराव, उपनगराध्यक्ष अनिल कुंदे, साहित्यिक व कवी विवेक उगलमुगले, सुदाम धारराव, यतीश राऊत, श्रीमती मंगला सोमवंशी, न्या रानडे विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त वि .दा. व्यवहारे , संस्थेचे सचिव रतन पाटील वडघुले ,संस्थेचे विश्वस्त राजेंद्र राठी ,दिलीप वाघवकर ,राजेश सोनी, मधुकर राऊत ,विश्वास कराड, नरेंद्र नांदे , वैनतेय विद्यालयाचे प्राचार्य बी. आर .सोनवणे, उपप्राचार्या श्रीमती मनीषा गुजराथी, पर्यवेक्षक गुलाब टकले, पर्यवेक्षक बाळासाहेब गुंजाळ ,मुख्याध्यापक एन डी शिरसाठ, प्राचार्य पल्लवी सानप ,मुख्याध्यापिका सुजाता तनपुरे , मुख्याध्यापिका प्रसन्ना कुलकर्णी आदि मान्यवर होते प्रारंभी न्या रानडे आणि सरस्वती मातेच्या ,तसेच न्या रानडे विद्या प्रसारक संस्थेच्या दिवंगत विश्वस्तांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले वैनतेय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम सादर केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे घेत भरारी उंच अंबरी ध्येयाप्रत जाऊ हे संस्था गीत सादर केले प्रास्ताविक न्या रानडे विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे कार्यकारी विश्वस्त वि.दा. व्यवहारे यांनी केले या विद्यार्थी, शिक्षक गुणगौरव सोहळ्यात वैनतेय विद्यालयाच्या स्थापनेच्या 1964 साली असणारे सेवानिवृत्त शिक्षक वि. दा.व्यवहारे , शंकर गायकर , पहिल्या मुख्याध्यापिका स्वर्गीय शांताबाई लिमये यांच्या कन्या डॉ शोभा नेर्लीकर , सेवक शिवराम सैंद्रे यांचा सत्कार करण्यात आला तसेच वैनतेय विद्यालयाच्या स्थापनेच्या 64 ते 68 या वर्षात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा , तसेच एम पी एस सी ,यु पी एस सी परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्याचा , मागील व यावर्षी 10 वी,12 वी आणि इतर क्षेत्रात यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ विश्वास देवकर यांच्या हस्ते करण्यात आला पत्रकार डॉ विश्वास देवकर म्हणाले की विद्यार्थ्यांनी, नव्या पिढीने ,थोर पुरुषांचे ,आचार ,विचार संस्कार आपल्या जीवनात अवलंबून पुढील आयुष्यात परिवर्तनाचे सुंदर साधन व्हावे. आपण आपल्या आयुष्यात लोकशाही सक्षम करण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे असेही ते म्हणाले याप्रसंगी अँड आप्पासाहेब उगावकर ,निफाडच्या नगराध्यक्ष कविता धारराव, उपनगराध्यक्ष अनिल कुंदे ,विवेक उगलमुगले ,सुदाम धारराव, यतीश राऊत ,अवंतिका पाटील ,सुमन व्यवहारे यांची भाषणे झाली सूत्रसंचालन मीनाक्षी पवार, श्रीमती कांचन सानप यांनी केले आभार प्रदर्शन रतन पाटील वडघुले यांनी केले श्रीमती योगिता निगळ यांनी पसायदान म्हटलेयाप्रसंगी दत्ताकाका उगावकर, अँड अंजली उगावकर, शिवाजी ढेपले , रामदास व्यवहारे, माजी नगराध्यक्ष सुनीता कुंदे, प्रमोद जडे, विक्रम रंधवे , संजय कुंदे ,मधुकर शेलार , रमेश जाधव, संपत कराड, संदीप शिंदे, दिलीप कापसे, सुहास सुरळीकर, तसेच माजी विद्यार्थी ,सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते,